Friday, August 5, 2011

श्रावण ऋतू ...




श्रावणात येते जेव्हा पावसाची पहिली सर ,
आठवते मला माझे सुंदर आणि आनंददायी घर ...!!

पावसाचा पहिला थेंब जेव्हा धरणीत सामावतो ,
मनाला प्रसन्न करेल असा सुवास हवेत दरवळतो ...!!


सूर्याची किरणे नभ छेदून चहू दिशांनी पसरतात ,
त्यानंतर रंगीबिरंगी सुमने अजूनच टवटवीत दिसतात ...!!

पक्ष्यांचा थवा कसा मदमस्त होऊन , स्वछंदपणे आकाशात बागडत असतो ,

मेघांना छेदून नभापलीकडे जाण्याचा तो प्रवास अत्यंत स्फूर्तीदायी वाटतो ...!!


खळखळणार्या त्या नदीचा स्वर कर्णास किती मृदू आणि सुरैल जाणवतो ,
अमृततुल्य पाण्याचा आस्वाद घेऊन , आयुष्याची तहान भाग्ल्याचा अनुभव प्राप्त होतो ...!!


पहिल्या पावसात ओलेचिंब भिजण्याच्या अनुभव फारच अतुल्य असतो ,
कारण निसर्गाच्या सानिध्यात मग स्वर्गात आल्या सारखा भास होतो ...!!


उंच उंच पर्वतांवर जेव्हा ढगांची भेट होते ,
त्यांच्याकडे पाहून मला माझ्या मित्रांची फार आठवण येते ...!!

कोणाला पाऊस हवाहवासा वाटतो , तर कोणाला पाऊस नकोनकोसा वाटतो ,
पण मी मात्र श्रावण ऋतूची वाट फार आतुरतेने पाहत असतो ...!!

Sunday, March 20, 2011

Move On...


किती सोपं असतं ना हे बोलणं ,
विसरून जा मला आणि ''move on '' your जगणं ...

हे असे काही शब्दं उच्चार्लेस की मागचं सर्व काही आठवतं ,
तुझ्या सोबत घालवलेला एक एक क्षण समोर येऊन उभा राहतो...

बसलो होतो आपण एकाच नावेत , फार लांबचा प्रवास करण्यासाठी ,
कसलाही विचार केला नव्हता आपण , बांधल्या होत्या फक्त प्रेमाच्याच गाठी ...

तुझी साथ लाभल्यामुळे ,कोणतीच चिंता मनाला भिडत नव्हती ,
तुझ्यात रमून गेल्यामुळे , माझी तहान-भूकही हरपून गेली होती ...

सारं काही शांत आणि सुरळीत असताना , कुठून तरी एक भयानक वादळ आलं,
आणि काही सुचण्या अगोदरच , सगळ्या सुंदर स्वप्नांवर पाणी फेरून गेलं....

भानावर येईतोपर्यंत , तू क्षितिजा पलीकडे निघून गेली होतीस ,
तुझी वाट पाहत मी झुरून गेलो , आणि तू माझा विचार सुद्धा केला नाहीस ...

कोणतेही कारण न देता , तू मला अशी सोडून का गेलीस ,
जाता जाता मात्र , ह्या हसणाऱ्या डोळ्यांना , अश्रूंची भेट देऊन गेलीस ...

तू सारखी म्हणायचीस ना , की तुला प्रेम कधी जमलंच नाही ,
आणि मी ही तुला सारखं सांगायचो , की तुझ्या शिवाय माझा मन कशात रमलच नाही ...

किती सोपं असतं ना हे बोलणं ,
विसरून जा मला आणि ''move on '' your जगणं ...

Wednesday, December 23, 2009

आई...


आई आपली ९ महिने , आपल्या साठी अनंत यातना सोसते ,
पण त्या नंतरचे येणारे सुख मात्र, साऱ्या जगात अतुल्य असते !!!!

लहानपणापासून आई आपल्या साठी, कित्येक कष्ट घेते ,
तीच आपल्याला बोलायला , आणि चालायला शिकवते !!!!

संसार रुपी आयुष्य आपले , वटवृक्ष सारखे वाढते ,
कारण तिची संस्कार रुपी माया , आपल्याला लाभली असते !!!!

मोठे झाल्यावर आपण , आपल्याला सगळे कळते , असाच आपला समज असतो ,
आणि नंतर मग, आपण आपला शहाणपणा , आईला शिकवत असतो !!!!

आपण तरी किती सुखी आहोत , कि आपल्या जवळ आपली आई आहे ,
कधी त्यांचा हि विचार केला का, की ज्यांच्या कडून हे सुख ही हिरावून गेलं आहे !!!!

या सर्व विश्वात , आई पेक्षा मोठे काहीच नाही,
पण आज काल च्या जगात, आईची काळजी कोणी का बरं घेत नाही ????

माझ्या मनाची व्यथा.....


माझ्या या मनाची , काय सांगू व्यथा ,
कुठून सुरुवात करू , कळे न मज आता...(१)

जिच्यावर प्रेम केल , ती अशी का वागली ,
काचरूपी स्वप्नं माझी , क्षणात तोडून गेली ...(२)

त्या एका वर्षात , तुटलो मी सारा ,
प्रत्येक क्षणी शोधात होतो , मी प्रेमाचा आसरा ...(३)

त्यानंतर जगू कसे , उमगले नाही मना ,
वेड्यासारखा फिरत होतो , विचारात या जना...(४)

तहानलेला पक्षी जसा , पाण्यासाठी तडफडतो ,
तसाच मी तिच्यासाठी , स्वताशी झगडत होतो ...(५)

प्रत्येक व्यक्ती जसा , पावसाची वाट पाहत असतो,
तिच्या एका झाल्केसाठी , मी दिवसभर झुरत होतो...(६)

अचानक कधी दिसली , तर एवढा आनंद झाला ,
काळजाचे ठोके चुकले, तरी कळले नाही मला...(७)

पण हा आनंद , क्षणात भंग झाला ,
समोर येऊनही तिनं , बघितलाच नाही मला...(८)

त्याक्षणी माझा मन , एकदम थक्क झाले ,
हृदयात काहीतरी बोचलं , असेच एकदम वाटले...(९)

प्रेम हे असेच असते का , मी मनाला विचारला ,
मन हि हसत उत्तरला , " प्रेम हे असच असतं,प्रेम हे असच असतं..प्रेम हे शेवटी आंधळ्च असतं "...(१०)