
किती सोपं असतं ना हे बोलणं ,
विसरून जा मला आणि ''move on '' your जगणं ...
हे असे काही शब्दं उच्चार्लेस की मागचं सर्व काही आठवतं ,
तुझ्या सोबत घालवलेला एक एक क्षण समोर येऊन उभा राहतो...
बसलो होतो आपण एकाच नावेत , फार लांबचा प्रवास करण्यासाठी ,
कसलाही विचार केला नव्हता आपण , बांधल्या होत्या फक्त प्रेमाच्याच गाठी ...
तुझी साथ लाभल्यामुळे ,कोणतीच चिंता मनाला भिडत नव्हती ,
तुझ्यात रमून गेल्यामुळे , माझी तहान-भूकही हरपून गेली होती ...
सारं काही शांत आणि सुरळीत असताना , कुठून तरी एक भयानक वादळ आलं,
आणि काही सुचण्या अगोदरच , सगळ्या सुंदर स्वप्नांवर पाणी फेरून गेलं....
भानावर येईतोपर्यंत , तू क्षितिजा पलीकडे निघून गेली होतीस ,
तुझी वाट पाहत मी झुरून गेलो , आणि तू माझा विचार सुद्धा केला नाहीस ...
कोणतेही कारण न देता , तू मला अशी सोडून का गेलीस ,
जाता जाता मात्र , ह्या हसणाऱ्या डोळ्यांना , अश्रूंची भेट देऊन गेलीस ...
तू सारखी म्हणायचीस ना , की तुला प्रेम कधी जमलंच नाही ,
आणि मी ही तुला सारखं सांगायचो , की तुझ्या शिवाय माझा मन कशात रमलच नाही ...
किती सोपं असतं ना हे बोलणं ,
विसरून जा मला आणि ''move on '' your जगणं ...
किती सोपं असतं ना हे बोलणं ...
ReplyDeleteविसरून जा मला आणि ''move on '' your जगणं ...
खुप Best !!!!
gud one prajakt...
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletejust tooo good man!!!!
ReplyDeleteaprateem ... u really have that skills in u buddy... chan ahe ajun lihee.. :)
ReplyDeletevery touching and sensible....i think sometime we should think practically in Life...and another thing try to find out flaws in u too.
ReplyDeleteKeep it up...........Alles Gute